मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात ए लाव रे तो व्हिडीओ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आश्वासनांची पोलखोल करणार्या सभांचा धडाका लावला असतानाच राज यांच्या मुंबईत बुधवारी होणार्या सभेला निवडणूक आयोगाने परवानगी नाकारून धक्का दिला आहे. राज ठाकरे यांच्या 24 एप्रिल रोजी होणार्या मुंबईतील काळाचौकी-अभ्युदयनगर येथील सभेला निवडणूक आयोगाने परवानगी नाकारली आहे. मनसे लोकसभा निवडणूक लढवत नसल्याचे कारण देत निवडणूक अधिकार्यांनी या सभेला लाल कंदिल दाखवला आहे. सभेला परवानगी नाकारताना निवडणूक आयोगाने मनसेला स्थानिक प्राधिकरणाकडून परवानगी घेण्यास सांगत परवानगीचा चेंडू महापालिकेकडे टोलवला आहे. आता राज ठाकरे याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.